एखाद्या मालिकेमुळे माझ्या वडिलांची राष्ट्रभक्ती कमी होत नाही – राहुल गांधी

73

नवी दिल्ली, दि. १५ (पीसीबी) – माझे वडिल या देशासाठी जगले, देशासाठी त्यांनी मरण पत्करले, हे सत्य ‘सेक्रेड गेम्स’ या काल्पनिक वेब सीरिजमधल्या पात्रांमुळे बदलणार नाही, असे टि्वट काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केले आहे.

नेटफ्लिक्सवरच्या ‘सेक्रेड गेम्स’ या वेब सीरिजमध्ये दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांची बदनामी करण्यात आली आहे. त्यामुळे राहुल गांधींनी टि्वट करुन आपली भूमिका स्पष्ट केल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, माझा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर विश्वास आहे, स्वातंत्र्य हा मूलभूत लोकशाही अधिकार आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर नियंत्रण ठेवले पाहिजे असे भाजप आणि आरएसएसला वाटते, असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.