‘एक बार मैने कमिटमेंट कर ली, तो मै खुद की भी नही सुनती’ – पंकजा मुंडे

100

बीड, दि. २५ (पीसीबी) – ‘एक बार मैने कमिटमेंट कर ली, तो मै खुद की भी नही सुनती’ अशा फिल्मी डॉयलॉगात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या करण्याच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली. 

राज्यातील जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन करण्याचा ऐतिहासिक निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला. अनेकांच्या दबावाला न जुमानता हा निर्णय घेण्यात आला आहे. याबद्दल पंकजा मुंडे यांचा शिक्षक संघटनांच्या वतीने बीड शहरात सत्काराचे आयोजन केले  होते. त्यावेळी मुंडे बोलत होत्या.

बदल्यांचा निर्णय घेताना दबाव होता. अनेक आमदार असा निर्णय घेऊ नका, असे सांगत होते. मात्र, या दबावाला बळी न पडता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या परवानगीने ऑनलाईन बदलीचा निर्णय घेतला. त्यामुळे राज्यातील जवळपास सव्वा लाखापेक्षा जास्त शिक्षकांच्या  पहिल्यांदाच इतक्या पारदर्शक बदल्या झाल्या आहेत, असे पंकजा मुंडे यांनी सांगितले.