एका वर्षात ७० लाख रोजगाराची निर्मिती

66

नवी दिल्ली, दि. १२ (पीसीबी) – देशातील घसरलेल्या रोजगाराच्या संख्येवरून केंद्र सरकारला घेरणाऱ्या विरोधकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वृत्तसमूहाला दिलेल्या विशेष मुलाखतीत ठोस प्रत्युत्तर दिले. ‘रोजगाराची निश्चित आकडेवारी जाहीर करणारी यंत्रणाच नसल्याने विरोधकांच्या हाती टीकेचे अस्त्र आले आहे. पण ईपीएफओच्या आकडेवारीनुसार केवळ संघटित क्षेत्रात सप्टेंबर, २०१७ ते एप्रिल, २०१८ या काळात ४५ लाख रोजगार निर्माण झाले आहेत. हीच माहिती आधार मानली असता, रोजगार निर्मिती केवळ सन २०१७मध्येच ७० लाखांपर्यंत पोहोचते’, अशी आकडेवारीच पंतप्रधान मोदी यांनी जाहीर केली.