एका तरुणाने मुली सोबत पळून जाऊन ”प्रेमविवाह” केला.मग काय झालं ते पहा …

26

चाकण दि .१२ (पीसीबी) – एका तरुणाने मुली सोबत पळून जाऊन प्रेमविवाह केला. त्या रागातून मुलीच्या नातेवाईकांनी मुलाच्या नातेवाईकांना बेदम मारहाण केली असल्याची घटना शुक्रवारी (८ ऑक्टोबर) रोजी रात्री नऊ वाजता खेड तालुक्यातील खालुंब्रे गावात येथे घडली.

सुभाष लक्ष्‍मण धामणकर ( वय ५३ रा. उर्से ता. मावळ ) यांनी या प्रकरणी रविवारी १० ऑक्‍टोबर रोजी महाळुंगे पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार खंडू बापू पवार (वय ४८ ) पंडित बापू पवार (वय ४० ) आशुतोष खंडू पवार ( वय २०, रा. खालुम्ब्रे ता. खेड ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी धामणकर यांच्या मुलाने खंडू पवार यांच्या मुली सोबत पळून जाऊन कोर्ट मॅरेज केले. त्यानंतर झालेल्या गोष्टींचा राग न धरता एकत्र येण्यासाठी दोन्हीकडच्या मंडळींनी शुक्रवारी रात्री बैठक घेतली. बैठकीत बाचाबाची झाल्याने फिर्यादी धामणकर यांचे मेहुणे, चुलत भाऊ यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण झाली. फिर्यादी धामणकर मध्ये पडल्याने यांचा डावा हात फ्रॅक्चर झाला.

तसेच फिर्यादी यांच्या मेहुण्याला मारहाण करून जखमी करण्यात आले. तुम्हाला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. महाळुंगे पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

WhatsAppShare