एकही लस कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटवर परिणामकारक नाही

134

नवी दिल्ली, दि. २२ (पीसीबी) – सध्या परिस्थितीमध्ये जगभरातील कोरोना लसींपैकी जवळजवळ सर्वच लसी या करोनाच्या डेल्टा व्हेरिएंटवर परिणामकारक दिसत नाहीय. यासंदर्भातील माहिती जागतिक आरोग्य संघटनेचे संसर्गजन्य रोगांच्या जाणकारांनी सांगितलं आहे. भविष्यामध्ये करोना विषाणूचे नवीन पद्धतीचे व्हेरिएंटही पहायला मिळतील. या व्हेरिएंटवर लस प्रभावी ठरणार नाही अशी भीतीही व्यक्त करण्यात आली आहे. मात्र दुसरीकडे जगभरामध्ये करोनाविरुद्ध लढ्यात लसीकरणाचा प्रधान्य दिलं जात असून जास्तीत जास्त लोकांचं लसीकरण करण्याचे सर्वच देश प्रयत्न करत आहेत.

सध्या लसीकरणामुळे करोनापासून सुरक्षित राहण्यासाठी आणि मृत्यूदर आटोक्यात आणण्यासाठी फायदा होत असला तरी सतत म्युटेड होत राहणाऱ्या करोना विषाणूच्या नव्या प्रकारांमुळे चिंतेत भर पडली आहे. या विषाणूमध्ये सतत होत राहणाऱ्या म्युटेशनमुळे खूप बदल झालेल्या विषाणूच्या प्रकारावर म्हणजेच कॉन्स्टीलेशन ऑफ म्युटेशन असणाऱ्या विषाणूवर लसीचा परिणाम होणार नाही, असं मत मारिया व्हॅन केर्कोव्ही यांनी व्यक्त केलं आहे. भविष्यात या विषाणूला म्युटेड होण्याची संधीच उपलब्ध होऊ न देण्यासंदर्भात संशोधन होणं गरजेचं असल्याचंही मारिया यांनी म्हटलंय.

डेल्टा व्हेरिएंट किंवा बी.१.६१७.२ व्हेरिएटमुळेच भारतामध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक परिणाम दिसून आल्याचं मानलं जात. आकडेवारीनुसार यूनायटेड किंग्डममध्ये सध्या तिसरी लाट आली असून त्यासाठी हा डेल्टा व्हेरिएंटच जबाबदार आहे. आता डेल्टा व्हेरिएंटमध्येही म्युटेशन होत असून त्याचे रुपांतर डेल्टा प्लस व्हेरिएंटमध्ये झालं आहे. भारतामध्ये सध्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. करोनाच्या या उत्पपरिवर्तीत विषाणूचे म्हणजेच डेल्टा प्लसचे महाराष्ट्रामध्ये २१ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी यात रत्नागिरी जिल्ह्य़ात नऊ, जळगाव जिल्हा सात, मुंबईत दोन, ठाणे, पालघर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी एका रुग्णांचा समावेश आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी स्पष्ट केलं. केरळमध्येही डेल्टा व्हेरिएंटचे तीन रुग्ण आढळून आलेत.

यापूर्वी इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च म्हणजेच आयसीएमआरच्या वैज्ञानिकांनी आपल्या संशोधनाच्या प्राथमिक अहवालांमध्ये भारतात देण्यात येणाऱ्या कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिन लसी या डेल्ट व्हेरिएंटविरोधात खूप कमी प्रमाणात अ‍ॅण्टीबॉडी निर्माण करतात. मात्र डेल्ट व्हेरिएंट सोडल्यास या लसी इतर व्हेरिएंटवर प्रभावी असल्याचं सांगण्यात आलेलं.

WhatsAppShare