एकतर्फी प्रेमातून महिलेचा खून करणा-या प्रियकराचा उपचारादरम्यान मृत्यू

0
SONY DSC

पिंपरी,दि. २ (पीसीबी) – एकतर्फी प्रेमातून एका प्रियकराने विवाहित महिलेवर चाकूने वार करून तिचा खून केला. त्यानंतर स्वतः देखील चाकूने भोकसून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. गंभीर जखमी झालेल्या प्रियकराला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

अरविंद शेषराव गाडे असे मृत्यू झालेल्या आरोपी प्रियकराचे नाव आहे. या घटनेत त्याने 29 वर्षीय महिलेचा खून केला. होता. याबाबत महिलेच्या 38 वर्षीय पतीने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादी यांच्या घराशेजारी राहत होता. तो फिर्यादी यांच्या पत्नीकडे प्रेमाची मागणी करून तिला त्रास देत होता. त्याला फिर्यादी यांच्या पत्नीने नकार दिला होता. शनिवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास फिर्यादी यांची पत्नी कामावरून पायी चालत घरी येत होती. त्यावेळी आरोपीने त्यांना शिवतेजनगर येथे अडवले. त्यांच्यावर चाकूने हल्ला करून खून केला.

त्यानंतर आरोपीने स्वतावर देखील वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. गंभीर जखमी झालेल्या आरोपीला पिंपरी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, शनिवारी रात्री साडेसात वाजताच्या सुमारास त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare