एकतर्फी प्रेमातून पठया मुलीला भेटायला चक्क विमानाने गेला अन् मार खाऊन आला.. नक्की काय झालं…

4

बंगळूर,दि.१३ (पीसीबी) : एकतर्फी प्रेमातून प्रियकर वाट्टेल ते करतात. मात्र याची किंमतही त्यांना चुकवावी लागते. असाच काहीसा प्रकार बंगळुरूहून लखिमपूर आलेल्या एका तरुणासोबत घडला. हा तरुण एकतर्फी प्रेमापोटी मुलीची भेट घेण्यासाठी बंगळुरूहून लखिमपूरला आला होता. तरुणीची तर भेट झाली नाहीच, मात्र कुटुंबियांनी आणि गल्लीतील लोकांनी मात्र त्याला चांगलाच चोप दिला. तसेच यानंतर त्याला पोलिसांच्याही हवाली दिले.

‘आज तक‘ने दिलेल्या वृत्तानुसार अशी माहिती समोर अली आहे कि, ‘देवरिया जिल्ह्यातील गौरीबाजार पोलीस स्थानक भागात असणाऱ्या पखरा गावचा रहिवासी सलमान अंसाही हा बंगळुरूमध्ये एसी मॅकेनिक म्हणून काम करतो. सात महिन्यांपूर्वी एका मोबाईल अॅपद्वारे सलमानची ओळख लखिमपूर खिरी जिल्ह्यात राहणाऱ्या एका तरुणीशी झाली होती. दोघांमध्ये मेसेजची देवाण-घेवाण होत होती आणि फोनवरून संवादही साधला जात होता. मुलगी आपल्याशी बोलतेय, मेसेज करतेय म्हणजे ती आपली गर्लफ्रेंडच झालीय असा समज सलमानचा झाला. यानंतर त्याने पुढचे पाऊल टाकत मुलीची भेट घेण्याचे ठरवले आणि मित्रासोबत दुकानात जाऊन एक टेडी बिअर, चॉकलेट आणि मिठाई गिफ्ट म्हणून घेऊनही आला. यानंतर हे गिफ्ट घेऊन तो बंगळुरूहून लखनऊला विमानाने आला.

WhatsAppShare