एआयएसएसएमएस कॉलेज ऑफ इंजिनीरिंग पुणे येथे रोबोटिक्स प्रोसेस ऑटोमेशन सेंटरचे उद्घाटन

84

पुणे, दि. १५ (पीसीबी) – इंजिनीरिंग क्षेत्रात दिवसेंदिवस नव्या तंत्रज्ञानाची भर पडत आहे आणि या बदलत्या तंत्रज्ञानाचे ज्ञान येणाऱ्या अभियंत्यांना अवगत व्हावे यासाठी एआयएसएसएमएस कॉलेज ऑफ इंजिनीरिंग, पुणे येथे “ऑटोमेशन एनीव्हेअर, पीडब्लूसी व एआयएसएसएमएस कॉलेज ऑफ इंजिनीरिंग,पुणे” यांच्या संयुक्त विद्यमाने रोबोटिक्स प्रोसेस ऑटोमेशन सेंटरचे उदघाटन आज (सोमवार) करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सहसचिव सुरेश प्रताप शिंदे, पीडब्लूसी सुमित श्रीवास्तव, सागर कोठे, ऑटोमेशन एनीव्हेअरचे अरविंद थोठाद्री, कृष्णा राजू, अश्विन, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डि. एस.बोरमने आदी उपस्थित होते.

यावेळी पीडब्लूसीचे सुमित श्रीवास्तव म्हणाले, रोबोटिक्स प्रोसेस ऑटोमेशन सेंटरच्या माध्यमातून महाविद्यालयातील विध्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देण्यात येणार असून ,विध्यार्थ्यांना नव्या तंत्रज्ञानाची ओळख होईल व प्लेसमेंटच्या नव्या संधी उपलब्ध होतील त्याचबरोबर येणाऱ्या काळात या तंत्रज्ञानाची मागणी वाढणार असून तब्बल तीन लाख रोजगाराच्या संधी  यामुळे उपलब्ध होतील व भविष्यात नोकरी मिळवायची असेल तर विद्यार्थ्यांनी पुस्तकी ज्ञानाबरोबरच अभ्यासेतर उपक्रमात सहभाग नोंदवावा.

यावेळी इलेक्ट्रॉनिक्स व टेलीकम्युनिकेशनचे डॉ.डी जी भालके यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले तर सूत्रसंचालन नवले यांनी केले. तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक व कर्मचारी वृंद यांनी सहकार्य केले.