‘एआयएडीएमके’ पक्षाचे बंडखोर नेते दिनाकरन यांच्या कारवर बाँम्ब हल्ला

76

चेन्नई, दि. २९ (पीसीबी) – ‘एआयएडीएमके’ पक्षाचे बंडखोर नेते टी. टी. व्ही. दिनाकरन यांच्या निवासस्थानासमोरील कारवर अज्ञातांनी पेट्रोल बाँम्ब टाकल्याने खळबड उडाली आहे. या घटनेत तिघेजन जखमी झाले आहेत. ही घटना आज (रविवार) दुपारच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, दिनाकरन यांच्या निवासस्थानसमोरील कारवर आज (रविवार) अज्ञातांनी पेट्रोल बाँम्ब फेकले. त्यावेळी दिनाकरण कारमध्ये नसल्याने मोठा अनर्थ टळला. दिनाकरन या घटनेत सुखरूप असले, तरी त्यांचा छायाचित्रकार आणि ड्रायव्हर या घटनेत जखमी झाले आहेत. चेन्नई येथील मालार हॉस्पिटलमध्ये या दोघांना दाखल करण्यात आले आहे. घटनेत कार पूर्णपने जळून खाक झाली आहे. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे.