ऋषभ पंत अजुनही लहान, त्याला बऱ्याच गोष्टी शिकणे गरजेचे – डीन जोन्स

0
758

नवी दिल्ली, दि. ७ (पीसीबी) –  महेंद्रसिंह धोनीच्या अनुपस्थितीत भारतीय संघात यष्टीरक्षणाची जबाबदारी मिळालेल्या ऋषभ पंतला सध्या टीकेचा भडीमार सहन करावा लागतो आहे. विश्वचषकानंतर विंडीज आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या मर्यादीत षटकांच्या सामन्यात पंतची फलंदाजीतली कामगिरी निराशाजनक होती. याचसोबत बांगलादेशविरुद्ध पहिल्या टी-२० सामन्यातही पंतने यष्टीमांगे बऱ्याच चुका केल्या. ऑस्ट्रेलियाचे माजी फलंदाज डीन जोन्स यांच्या मते, ऋषभ पंत अजुनही लहान असून त्याला अनेक गोष्टी शिकणे गरजेचे असल्याचे जोन्स यांनी म्हटले आहे.

“ऋषभ पंत अजुनही लहान आहे, तो बऱ्याच गोष्टी शिकणे गरजेचे आहे. अनेकदा आजुबाजूला काय घडते आहे याचा त्याला अंदाज नसतो. सध्याच्या घडीला त्याला OFF साईडच्या फटक्यांमध्ये सुधारणा करणे गरजेचे आहे. माझ्यमते तो सध्या एककल्ली खेळ करतो”, डीन जोन्स एका मुलाखतीमध्ये बोलत होते.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेतही भारतीय संघाने पंतला विश्रांती देत साहाला संघात स्थान दिले होते. यष्टींमागे साहाने सर्वोत्तम कामगिरी करत आपली निवड सार्थ ठरवली होती. मात्र बांगलादेशविरुद्ध पहिल्या टी-२० सामन्यात झालेल्या चुकीनंतरही रोहितने ऋषभची पाठराखण केली होती. त्यामुळे आगामी काळात ऋषभच्या खेळात कधी सुधारणा होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.