ऊरुळी कांचनमध्ये कार विहिरीत कोसळून दोघांचा मृत्यू

102

पुणे, दि. ९ (पीसीबी) – उरुळी कांचन येथे (एमएच/१२/पीझेड/२८२७) याक्रमांकाची ब्रिझा कार विहिरीत कोसळून झालेल्या भीषण अपघात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना आज (गुरुवार) सायंकाळच्या सुमारास उरुळी कांचनमधील शिंदवणे येथे घडली.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आज सायंकाळच्या सुमारास मारुती कंपनीची ब्रिझा (एमएच/१२/पीझेड/२८२७) ही कार विहीरीत पडले. या भीषण अपघातामध्ये कारमधील दोघांचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन कारमधील दोघांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत.