उसाच्या ट्रकखाली घासत गेलेल्या ‘त्या’ व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू

38

खेड, दि.31(पीसीबी) : उसाच्या ट्रकने धडक देऊन काही अंतरावर घासत नेल्याने गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना खेड तालुकयातील कोयाळी येथे घडली.

संतोष सदाशिव भाडळे असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत भानुदास सदाशिव भाडळे (वय 34, रा. कोयाळी, ता. खेड) यांनी बुधवारी (दि. 30) आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी एम एच 12 / ई एफ 0139 या क्रमांकाच्या ट्रक चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या शेताच्या शेजारील शेतात ऊस तोडणी सुरु होती. ऊस नेण्यासाठी आरोपी ट्रक चालक ट्रक घेऊन आला होता. त्याने शेतात उतारावर ट्रक थांबवला. त्यावेळी मयत संतोष भाडळे ट्रकच्या पुढे काही अंतरावर असलेल्या बाभळीच्या झाडाखाली बसले होते. काही वेळानंतर आरोपीने ट्रक सुरु केला आणि थेट संतोष यांच्या अंगावर घातला. काही अंतरापर्यंत संतोष यांना सरपटत नेले. त्यात संतोष गंभीर जखमी झाले. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare