उर्से टोलनाक्याजवळ टेम्पो चालकाला लुटले

127

उर्से, दि. १४ (पीसीबी) – लघुशंकेसाठी थांबलेल्या टेम्पो चालकास चार अज्ञात चोरट्यांनी बेदम मारहाण केली. तसेच त्याच्याजवळील ६१ हजार ७०० रुपयांची रोख आणि एटीएम कार्ड काढून घेतले. हा प्रकार पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर उर्से टोलनाक्या जवळील पेट्रोल पंपालगत शुक्रवारी (दि.१२) पहाटे साडेपाचच्या सुमारास घडला.

याप्रकरणी टेम्पोचालक हजरात कासिमसाब बुर्ली (४८, हिरेमसळी, ता. इंडी, जि.विजापूर, कर्नाटक, सध्या रा. भिवंडी, पडघा, ठाणे) यांनी फिर्याद दिली आहे. शुक्रवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास जखमी हजरत बुर्ली हे त्यांचा टेम्पो (क्र.एमएच/१२/एमव्ही/७८६९) घेवून मुंबईहून हैद्राबादकडे जात होते. ते उर्से टोलनाक्याजवळील एका पेट्रोल पंपानजीक लघुशंका करण्यासाठी थांबले होते. यावेळी चार अज्ञात चोरट्यांनी बुर्ली यांना लाथाबुक्याने मारहाण करून ६१ हजार ७०० रुपायांसह एक एटीएम जबरीने चोरुन नेले. पुढील तपास पोलीस निरीक्षक नारायण पवार करत आहे.