उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नाना पटोलेंचे नागपूरात जंगी स्वागत; काँग्रेसचे नेते मात्र अनुपस्थित

81

नागपूर, दि. १५ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीसाठीच्या उमेदवारांची  दुसरी यादी बुधवारी (१३ मार्च) काँग्रेसने जारी केली. यामध्ये महाराष्ट्रातील पाच उमेदवारांचा समावेश आहे. भाजपच्या खासदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये घरवापसी केलेल्या नाना पटोले यांनाही काँग्रेसने नागपूरमधून उमेदवारी दिली आहे.

नागपूरातून काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नाना पटोले दिल्लीहून रेल्वेद्वारे नागपूरात दाखल झाले. रेल्वे स्थानकावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित असताना मात्र नागपुरातील काँग्रेस पक्षाचे सर्व ज्येष्ठ नेते यावेळी अनुपस्थित होते. विलास मुत्तेमवार, नितीन राऊत अनीस अहमद हे नागपूर काँग्रेसमधी प्रमुख नेते नाना पटोले यांच्या स्वागतावेळी अनुपस्थित होते.