उमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक आयुक्त

75

मुंबई, दि. १८ (पीसीबी) –  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्जासोबत दाखल करण्यात येणाऱ्या शपथपत्रात उमेदवारांना स्वत:च्या आणि त्याच्यावर अवलंबित असलेल्या सदस्यांच्या उत्पन्नाचा स्त्रोत आणि उत्पन्नाचे आणि विविध करारांचे तपशील सादर करावे लागणार आहेत. तसेच याआधी निवडणूक लढवली असल्यास त्याबाबतची माहिती  देणे बंधनकारक असेल, अशी माहिती  राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज (शनिवार) येथे दिली.