‘उभा चिरून टाकेल’ म्हणत टोळक्याकडून तरुणास मारहाण

103

हिंजवडी, दि. २७ (पीसीबी) – किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणाचा राग मनात धरून एका टोळक्याने तरुणास बेदम मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 26) साखरे वस्ती, हिंजवडी येथे घडली.

प्रसाद बालवडकर (पुर्ण नाव पत्ता माहीत नाही) व त्याचे सहा अनोळखी साथीदार (नाव, पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत किशोर तानाजी बोरकर (वय 29 रा. मुकाई नगर, हिंजवडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास फिर्यादी बोरकर हे आयुश्री मोबाईल शॉपी समोर, साखरे वस्ती, हिंजवडी येथे आपल्या ओळखीचे आदिनाथ काळे यांच्या सोबत बोलत उभे होते. आरोपी प्रसाद बालवडकर याच्यासोबत पूर्वी किरकोळ कारणावरून वाद झाला होता. या भांडणाचा राग मनात ठेवून आरोपी आपल्या साथीदारांसोबत तिथे आला. फिर्यादी यांना शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. त्यापैकी एकाने फिर्यादी बोरकर यांच्या उजव्या हाताच्या कोपरावर दगड फेकून मारून हाड मोडून जबर जखमी केले. तसेच दुसऱ्या आरोपीने फिर्यादी यांना ‘उभा चिरून टाकेल’, अशी धमकी दिली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare