उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू पुण्यात आगमन; उद्या बारामतीत पवारांच्या घरी स्नेहभोजन

488

पुणे, दि. २१ (पीसीबी)- उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांचे आज वायुसेनेच्या विमानाने पुणे येथील लोहगाव विमानतळावर आगमन झाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. पुणे येथील विविध समारंभास उपस्थित राहण्यासाठी पुण्यात त्यांचे आगमन झाले आहे.

यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे, लेफ्टनंट जनरल मनोज पांडे,विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर, पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला, जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनीही उपराष्ट्रपती महोदय यांचे स्वागत केले

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू उद्या (शुक्रवारी, २२ जून) बारामती दौ-यावर जाणार आहेत. केंद्र सरकारच्या कृषी विज्ञान केंद्र माळेगाव (ता. बारामती) येथील प्रकल्पांना भेट देणार आहेत. तसेच विद्या प्रतिष्ठान कॉलेजमधील शरद पवार यांच्या वस्तुसंग्राहलयाला भेट देतील. तसेच उद्या दुपारी दोन वाजता पवार कुटुंबासह उपराष्ट्रपती स्नेहभोजन करणार आहेत.