उन्नाव बलात्कार आणि हत्या प्रकरणातील मुख्य साक्षीदाराचा संशयास्पद मृत्यू

209

उन्नाव, दि. २३ (पीसीबी) – उत्तर प्रदेशातील उन्नाव बलात्कार आणि हत्या प्रकरणातील मुख्य साक्षीदाराचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. इतकेच नाही तर या साक्षीदाराचा मृतदेह शवविच्छेदन न करता पुरण्यात आला आहे.

युनुस असे या मुख्य साक्षीदाराचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवार (दि.१८ ऑगस्ट) युनुस याचा मृत्यू झाला. त्याच्या पार्थिवाचे शवविच्छेदन न करता त्याचा मृतदेह पुरण्यात आल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. उन्नाव येथील भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगरवर बलात्काराचा आरोप आहे. उन्नाव बलात्कार प्रकरणातील १७ वर्षीय पीडित मुलीने एप्रिल महिन्यात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या लखनऊ येथील कार्यालयाबाहेर स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर प्रसारमाध्यमांनी हा विषय उचलून धरला. पीडित मुलीच्या वडिलांचा मृत्यू ९ एप्रिल रोजी माखी पोलिसांनी केलेल्या मारहाणीमुळे झाला. युनुस या सगळ्या प्रकरणातील मुख्य साक्षीदार होता. त्याच्या मृत्यूनंतर कुलदीप सिंह सेनगर यांच्या इशाऱ्यावरूनच युनुसला विष देऊन ठार करण्यात आले असा आरोप त्याच्या काकांनी केला आहे.