उन्नती सोशल फाऊंडेशनच्या वतीने पिंपळेसौदागरमध्ये हिंदू साम्राज्य दिवस साजरा

52

चिंचवड, दि. २५ (पीसीबी) – हिंदू साम्राज्य दिवस उन्नति सोशल फाऊंडेशनच्या वतीने पिंपळे सौदागर येथे हिंदू साम्राज्य दिवस साजरा करण्यात आला.

यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष अनंत कुसरे, निर्मलचंद्र उद्योजी उपस्थित होते. यावेळी गुलाब मेठे, राजेंद्र जयस्वाल, महेश गवस, संजय भिसे, कुंदा भिसे, जगन्नाथ काटे तसेच आनंद हास्य क्लबचे सभासद  उपस्थित होते.

अनिल बोपर्डीकर यांनी शिवाजी महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकत त्यांनी हिंदू साम्राज्य कसे निर्माण केले. त्यासाठी महाराजांनी केलेले प्रयत्न व त्यांचे असलेले नियम आदी गोष्टींची त्यांनी माहिती दिली.