उधाणलेल्या तरुणाईला फ्रेंडशिप डे’च याडं लागलं; गिफ्टशॉपीने बाजारपेठाही सजल्या

32

पिंपरी, दि. ३ (ओंकार गोरे) – दरवर्षी ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार हा दिवस ‘फ्रेंडशिप डे’ (मैत्री दिवस) म्हणून जगभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. तरुणाईला या दिवसाचे प्रचंड वेड लागले आहे. मित्रांबद्दलच्या भावना व्यक्त करण्याची ही एक नामी संधी म्हणूनदेखील या दिनाकडे पाहिले जाते. दोन मित्रांमध्ये भांडण झाले असेल तर, या दिवशी झालेल्या भांडणावर पडदा टाकून नवीन मैत्रीपर्वास सुरुवात केली जाते. त्यामुळे हा दिवस साजरा करण्यासाठी बाजारपेठेत फ्रेंडशिप बँड’ची मोठ्या प्रमाणात आवक झाली असून बाजारपेठाही फुलल्या आहेत.