उधाणलेल्या तरुणाईला फ्रेंडशिप डे’च याडं लागलं; गिफ्टशॉपीने बाजारपेठाही सजल्या

220

पिंपरी, दि. ३ (ओंकार गोरे) – दरवर्षी ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार हा दिवस ‘फ्रेंडशिप डे’ (मैत्री दिवस) म्हणून जगभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. तरुणाईला या दिवसाचे प्रचंड वेड लागले आहे. मित्रांबद्दलच्या भावना व्यक्त करण्याची ही एक नामी संधी म्हणूनदेखील या दिनाकडे पाहिले जाते. दोन मित्रांमध्ये भांडण झाले असेल तर, या दिवशी झालेल्या भांडणावर पडदा टाकून नवीन मैत्रीपर्वास सुरुवात केली जाते. त्यामुळे हा दिवस साजरा करण्यासाठी बाजारपेठेत फ्रेंडशिप बँड’ची मोठ्या प्रमाणात आवक झाली असून बाजारपेठाही फुलल्या आहेत.

फ्रेंडशिप डे अवघ्या दोन दिवसावर (रविवारी दि. ५) येवून टेपलाय. सगळीकडे फ्रेंडशिप डे’चा बँड खरेदीचा उत्साह ओसंडून वाहत आहे. सध्या बाजारात फ्रेंडशिप बँडची किंमत १० रुपयांपासून सुमारे १५० रुपयापर्यंत आहे. शाळा कॉलेजेस मध्ये आत्ता पासूनच जोरदार तयारी सुरु झाली आहे. दुकानात सगळीकडे फ्रेंडशिप बँड लटकलेले दिसत आहेत व त्याच्या खरेदीस हि चांगला प्रतिसाद तरुण वर्गाकडून मिळत आहे.

नुकतेच अ‍ॅडमिशन घेऊन विद्यार्थ्यांचे कॉलेज सुरू झालेले आहे. यात नवीन मित्र-मैत्रिणींचे अनेक ग्रुप बघायला मिळतात आणि हेच मित्र फ्रेंडशिप डे सेलिब्रेट करण्याचे प्लॅन्स बनवतात. हातावर म्हणजे मनगटापासून ते कोपऱ्यापर्यंतचे हात भरून फ्रेंडशिप बँड बांधून घेणारी तरुणाई पाहिली की त्यांच्या उत्साहाने थक्क व्हायला होते. या डे निमित्त एकमेकांना बँड बांधून मैत्रीची कृतज्ञता व्यक्त करते.

फ्रेंडशिप डे, व्हॅलेंटाईन डे, फादर्स डे, मदर्स डे, रोज डे, हग डे सारखे नवनवीन डे थाटात साजरे करत तरुणाई नवीन ‘डे कल्चर’ निर्माण करते. अनेकजन तर या ‘डे’च्या निमित्ताने ग्रुपमध्ये फिल्म पाहणे, ट्रिपला जाणे, हॉटेला जाऊन जेवण करणे पसंत करतात. रविवारी (दि. ५) या डे’ची खास धूम पिंपरी-चिंचवडमधेही अनुभवयाला मिळेल.