उद्योगनगरीत तोडफोडीचे सत्र सुरूच; पिंपळेनिलखमध्ये सात वाहनाच्या काचा फोडल्या

79

चिंचवड, दि. १४ (पीसीबी) – एक दिवसांपुर्वीच मोहननगरमध्ये गाड्या तोडफोडीची घटना ताजी असतानाच पिंपळेनिलखमधील विनायकनगर येथे रस्त्यावर व पार्किंगउभा असणाऱ्या सात वाहनांच्या टोळक्याने काचा फोडून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार शुक्रवारी (दि. १३) रात्री एकच्या सुमारास घडला.

या प्रकरणी मयूर दिलीप मदने (वय ३०, रा. विनायकनगर, पिंपळेनिलख, सांगवी) यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयूर आणि इतरांनी हरदेव कृपा बिल्डिंगच्या पार्किंग आणि रस्त्यावर वाहने उभा केली होती. रात्रीच्या वेळी हातामध्ये धारदार हत्यारे घेऊन आलेल्या टोळक्याने सात वाहनांच्या काचा आणि पत्रा तोडफोड करून नुकसान केले. त्यामुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.

दरम्यान, पिंपरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक दिवसांपुर्वीच वाहनांची तोडफोड झालेली आहे. यातील आरोपी अद्याप पकडण्यात आलेला नाही. ही घटना ताजी असतानाच पुन्हा तोडफोड झाल्याने पोलिस चांगलेच वैतागले आहेत. तर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर स्थानिक पोलिसांची गुन्हेगारांवर वचक संपल्याचे दिसत आहे. सांगवी पोलिस तपास करत आहेत.