उद्धव ठाकरे सरकारची परीक्षा, उद्या पार पडणार बहुमत चाचणी

117

मुंबई,दि.२९(पीसीबी) – उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पदभारही स्विकारला आहे. मात्र उद्या उद्धव ठाकरे सरकारची खरी परीक्षा असणार आहे. उद्या विधानसभेत बहुमत चाचणी पार पडणार आहे.

दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बहुमत चाचणी पार पडणार आहे. शनिवारी कामकाज सुरु झाल्यानंतर दिलीप वळसे पाटील यांच्या नावाची घोषणा करण्यात येईल. त्यानंतर विरोधी पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची नेमणूक केली जाईल. यानंतर बहुमत चाचणी पार पडेल.

महाविकास आघाडी सरकारला ३ डिसेंबपर्यंत बहुमत सिद्ध करण्याची मुदत देण्यात आली होती. बहुमत सिद्ध झाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. दरम्यान दिलीप वळसे पाटील यांची विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

WhatsAppShare