“उद्धव ठाकरे यांनी ग्लोज, पीपीई किट घालून ‘मातोश्री‘बाहेर पडावं”

78

मुंबई, दि.२२(पीसीबी) – उद्धव ठाकरे यांनी ग्लोज, पीपीई किट घालून ‘मातोश्री‘बाहेर पडावं, असं म्हणत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.

राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रकोपाला ठाकरे सरकारला जबाबदार धरत भाजपने आज महाराष्ट्र बचाव आंदोलन पुकारलं आहे. या आंदोलनात भाजप उद्धव ठाकरेंना प्रमुख लक्ष्य करत आहेत. त्या दृष्टीने भाजपने तयारी देखील केली आहे. उद्धव ठाकरे यांनी ग्लोज,पीपीई किट घालून ‘मातोश्री‘बाहेर पडावे, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे. राज्यभरातील भाजप कार्यकर्ते व नागरिक घराबाहेर फलक, काळे झेंडे फडकवतील, काळ्या फिती लावतील आणि सरकारचा निषेध करीत निदर्शने करतील, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

दरम्यान जनतेसाठी प्रभावीपणे काम करण्यास सरकारला भाग पाडावे, यासाठी महाराष्ट्र बचाव आंदोलन असल्याचं पाटील यांनी सांगितलं. तसंच केंद्राप्रमाणेच राज्य सरकारनेही शेतकरी, मजूर, कामगार, बारा बलुतेदार व इतर अडचणीत आलेल्यांसाठी मदतीचे पॅकेज जाहीर करावे, अशी आमची प्रमुख मागणी असल्याचं देखील त्यांनी सांगितलं.

WhatsAppShare