उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतले सिध्दीविनायकाचे दर्शन

100

मुंबई, दि. १० (पीसीबी) – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (सोमवार) मुंबईतील सिध्दी विनायक मंदिरात जाऊन एकत्र दर्शन घेतले. सिध्दी विनायकाच्या चरणी दोघांनी एकत्र माथा टेकला. भारतीय पोस्ट विभागातर्फे  सिध्दीविनायक मंदिराचा पोस्टल स्टॅम्प तयार करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते या स्टॅम्पचे प्रकाशन करण्यात आले.