उद्धव ठाकरेच पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री होणार- संजय राऊत

54

मुंबई, दि.२६ (पीसीबी)- शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे पुढील पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री होणार असा दावा पुन्हा एकदा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.

शनिवारी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हा हा धक्का राष्ट्रवादी काँग्रेसला मानला जात होता. मात्र गेल्या तीन दिवसात ज्या काही घडामोडी घडल्या त्यानंतर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री होतील असे संजय राऊत  यांनी म्हटले आहे.