उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री होताना पाहणं ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट – छगन भुजबळ

172

मुंबई,दि.२८(पीसीबी) – शिवतिर्थावर आज सायंकाळी ६ वाजून ४० मिनिटांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्यावर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री होताना पाहणं ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे, असं राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात मी २५ वर्ष काम केलंय. आता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होत आहेत, हे पाहून अतिशय आनंद होतोय, असं ते म्हणाले.

ज्येष्ठ लेखक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांना यंदाचा महात्मा फुले समता पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आलं. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

WhatsAppShare