उदयनराजे राष्ट्रवादीतूनच निवडणूक लढवतील; राजू शेट्टींचा विश्वास   

486

सातारा, दि. ११ (पीसीबी) – साताऱ्याचे खासदार ‘उदयनराजेंना तिकिट देणे किंवा न देणे हा राष्ट्रवादीचा अंतर्गत प्रश्न आहे. मात्र, ते राष्ट्रवादीतूनच निवडणूक लढतील आणि पक्ष त्यांनाच उमेदवारी देईल, असा विश्वास  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केला.

शेट्टी शेतकरी मेळाव्यासाठी कऱ्हाडात आले होते. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. खासदार उदयनराजेंच्या उमेदवारीवरून त्यांना विचारले असता ते म्हणाले की,  खरे तर तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अंतर्गत प्रश्‍न आहे. मला वाटते की ते राष्ट्रवादीतूनच निवडणुक लढवतील. पक्ष त्यांनाच उमेदवारी देईल, असा माझा अंदाज आहे, असे ते म्हणाले. तर  सदाभाऊंच्या ऑफरची खिल्ली उडवत तेच दुसऱ्या पक्षाकडून उमेदवारी मागत आहेत. ते कुठल्या आधाराने ऑफर देतात, याचेच आश्‍चर्य वाटते, असे ते म्हणाले.

सदाभाऊंनी उदयनराजेंना रयत क्रांती संघटनेतून निवडणूक लढवण्याची  ऑफर दिली आहे, यावर शेट्टी म्हणाले, अशा अनेक ऑफर येत असतात. त्या गांभिर्याने घ्यायच्या नसतात. एक तर ते स्वत: दुसऱ्या पक्षाकडून उमेदवारी मागतात आणि कुठल्या आधाराने उदयनराजेंना ऑफर देत आहेत, याचेच मला आश्‍चर्य वाटते, असे ते म्हणाले.

WhatsAppShare