उदयनराजे यांच्या भाजपप्रवेशाच्या चर्चांना आज पूर्णविराम मिळणार

143

सातारा, दि.९ (पीसीबी) –  राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले राष्ट्रवादीला रामराम करत भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहेत. मात्र उदयनराजे यांच्या भाजपप्रवेशाच्या चर्चांना आज पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे.

उदयनराजेंनी कार्यकर्त्यांसोबत चर्चा करुनच अंतिम निर्णय घेणार असल्याचं म्हटलं आहे. आज ही महत्त्वाची बैठक होत आहे. त्यामुळे उदयनराजे भाजपमध्ये जाणार की राष्ट्रवादीतच राहणार याविषयीचा अंतिम निर्णय लवकरच होणार आहे.

खासदार उदयनराजे भोसले यांनी आज सकाळी ११ वाजता पुण्यात कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली आहे. मात्र बैठकीच्या ठिकाणाबद्दल गोपनीयता पाळण्यात आली आहे. त्यामुळे या बैठकीनंतर उदयनराजे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.