‘उदयनराजेंवर पवारांचा हात होता तर निवडून आले, हात काढला तर पडले – जितेंद्र आव्हाड

153

मुंबई, दि.१५ (पीसीबी) – जय भगवान गोयल यांच्या ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरून पेटलेले राजकारण आता एका वेगळ्याच वळणावर गेलेले बघायला मिळत आहे.आज सकाळीच उदयनराजेंनी पत्रकार परिषद घेऊन शरद पवारांना जाणता राजा हे ब्रीद वापरण्याबद्दल आक्षेप घेतला होता.

त्यावर जितेंद्र आव्हाडांनी उदयन राजेंना लक्ष करत बरंच काहीकाही सुनावले होत. आता नुकत्याच एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटले की ‘उदयन राजेंवर जोवर पवारांचा हात होता तर निवडून आले, हात काढला तर पडले त्यामुळे उदयन राजे हे भावनेच्या भरात काहीतरीच बोलत आहेत.

WhatsAppShare