उदगीरमध्ये जबरदस्तीने दुकाने बंद केल्याने दोन गटात वाद

338

उदगीर, दि. २५ (पीसीबी) – महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरामध्ये दोन गटांमध्ये वाद झाल्याची घटना घडली आहे. आंदोलकांच्या एका टोळक्याने जबरदस्तीने शहरातील दुकाने बंद करण्याचा प्रयत्न केला आहे. याला विरोध करण्यासाठी दुसरा गट सरसावल्याने दोन्ही गटात वाद झाला. आंदोलकांनी भाजीपाल्याचे नुकसानदेखील केले. दरम्यान पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

औरंगाबादमध्ये काकासाहेब शिंदे या तरुणाच्या मृत्यूनंतर आक्रमक झालेल्या मराठा समाजाने आता आक्रमक पवित्रा घेतला असून, मुंबईसह संपूर्ण राज्यभरात मराठा समाजाकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. लातूरमध्येदेखील या बंदचे परिणाम दिसून आले. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा पोलिसांनी काटेकोर व्यवस्था केली आहे.