उत्तर प्रदेशात हाय अलर्ट; लष्कर-ए-तोयबाने दिली बॉम्ब स्फोट करण्याची धमकी

62

लखनौ, दि. ६ (पीसीबी) – लष्कर-ए-तोयबा (एलईटी) या दहशतवादी संघटनेच्या धमकीचे पत्र उत्तर प्रदेश पोलिसांना मिळाले आहे. यात कृष्ण जन्मभूमी, वाराणसीचे काशी विश्वनाथ मंदिर, हापूड आणि सहारनपूर रेल्वे स्थानकात बॉम्ब स्फोट करण्याची धमकी देण्यात आली आहे. यामुळे उत्तर प्रदेश राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मिळालेल्या पत्रामध्ये ६, ८ आणि १० जूनला या प्रमुख ठिकाणी बॉम्ब स्फोट करण्याची धमकी देण्यात आली आहे. पत्रावर जम्मू-कश्मीरच्या एलईटीच्या मौलाना अंबू शेखची स्वाक्षरी आहे. तरी सुध्दा या पत्राच्या सत्यतेसंदर्भात तपास केला जात आहे.

गुप्तचर विभागाने (आयबी) पत्र मिळताच राज्यभरात हाय अलर्ट जारी केला असून, राज्य पोलीसही सतर्क झाले आहेत.