उत्तर प्रदेशात शिवसेना माजी जिल्हाप्रमुखाची गोळ्या झाडून हत्या

108

नवी दिल्ली, दि. २१ (पीसीबी) – उत्तरप्रदेशात शिवसेनेच्या माजी जिल्हाप्रमुखाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. अनुराग शर्मा असं या जिल्हाप्रमुखाचं नाव होतं. रामपूरमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. अनुराग यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारांच्या आधीच त्यांचा मृत्यू झाला यानंतर अनुराग यांच्या नातेवाईकांनी व समर्थकांनी मोठ्या प्रमाणावर गदारोळ घातला आणि रुग्णालयाची तोडफोडही केली. अनुराग शर्मा हे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख होते. त्यांची पत्नी भाजपाची सदस्य आहे.

रामपूरचे पोलीस अधीक्षक शगुन गौतम यांनी एएनआय ला याबाबत माहिती दिली. बुधवारी रात्री ८ वाजता शर्मा हे स्कूटरवरुन त्यांच्या घरी चालले होते. त्यावेळी दोन अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. ज्वाला नगरमध्ये ही घटना घडली. त्यांच्यावर दोन गोळ्या झाडण्यात आल्या. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिथे उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाला.

शर्मा हे स्कूटरवरुन त्यांच्या घरी जात होते. त्याचवेळी दोन अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि फरार झाले. त्यामुळे एकच खळबळ उडाली. त्यानंतर तातडीने पोलिसांना ही माहिती देण्यात आली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या शर्मा यांना पोलिसांनी रुग्णालयात दाखल केलं. मात्र तोपर्यंत अनुराग शर्मा यांचा मृत्यू झाला होता.

WhatsAppShare