उत्तर प्रदेशातील राजकारणाचे चित्र बदलण्याची जबाबदारी  माझी – प्रियंका गांधी

68

नवी दिल्ली,  दि. १७ (पीसीबी) – उत्तर प्रदेशमधील जनतेशी आपण फार पूर्वीपासूनच जोडलो गेलो आहे.  सध्याच्या घडीला येथील जनता ही सरकारमुळे अनेक अडचणींचा सामना करत आहे. आता उत्तर प्रदेशातील राजकारणाचे चित्र बदलण्याची जबाबदारी आपली आहे,  असा निर्धार  काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात व्यक्त केला आहे.

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर  प्रियंका उत्तर प्रदेश दौऱ्यावर आहेत. चार दिवसीय उत्तर प्रदेश दौऱ्यात त्यांनी आज (रविवारी) लखनऊ येखील पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यानंतर  त्या २०१७ मधील विधानसभा निवडणूकांच्या उमेदवारांचीही भेट घेणार आहेत.

त्यांच्यासोबत बैठक घेऊन काँग्रेसची आगामी निवडणूकांसाठीची रणनिती आखण्यालाच प्रियंका गांधी प्राधान्य देणार आहेत.  त्यासाठी त्यांनी कार्यकर्यांना उद्देशून एक पत्रही लिहिले आहे.  या पत्रात त्यांनी उत्तर प्रदेशशी असणाऱ्या आपल्या नात्याविषयी माहिती दिली.