उत्तराखंडमध्ये बस दरीत कोसळून ४५ ठार

37

डेहराडून, दि. १ (पीसीबी) – उत्तराखंडमध्ये बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात ४५ जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत २० मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहे.

पौडी गढवाल येथे हा अपघात घडला. भौण येथून रामनगरला जाणाऱ्या बसला हा अपघात झाला. बसमधून प्रवास करत असलेल्या ४५ प्रवाशांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये स्थानिक नागरिक असल्याची माहिती मिळत आहेत.

पोलिसांनी आणि एसडीआरएफच्या टीमने बचावकार्य सुरू केले आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अपघात नेमका कसा झाला, याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.