उत्तराखंडमध्ये गेल्या २० दिवसांत तब्बल ‘इतके’ पोलिस कोरोना पॉझिटिव्ह

23

गुरुग्राम ,दि.२८(पीसीबी) – देशात कोरोनाच्याच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलेले असताना कोरोनाचे संक्रमण हे वेगाने वाढत आहे. सामान्य लोकांना मदत करायला पुढे सारवलेले पोलिसही कोरोनाचा सपाट्यात येत आहे.

गुरुग्राम पोलिसातील ४५ पोलिस कर्मचाऱ्यांना आत्तापर्यंत कोरणाचा संसर्ग झाला आहे. त्याचबरोबर उत्तराखंडमधील ६०० सैनिकही कोरोनाला बळी पडले आहेत. गुरुग्राम येथील पोलिसांनी सांगितले कि, सहा एप्रिल पासून गेल्या २० दिवसात तब्बल ४५ पोलिसांना कोरोनाची लागण झाली. यामध्ये एक एसीपी, सात स्टेशन प्रभारी, 6 हेड कॉन्स्टेबल, एसआय, अठरा कॉन्स्टेबल आणि इतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार हे सर्वच कोरोना संक्रमित पोलीस कर्मचारी घरातच राहून उपचार घेत आहे. त्याचबरोबर उत्तराखंडमधील सहाशे सैनिकही कोरणा पॉझिटिव्ह झाले आहेत.

WhatsAppShare