उत्तरकाशीत बस दरीत कोसळली; १३ जणांचा मृत्यू

84

नवी दिल्ली, दि. ३ (पीसीबी) – उत्तर प्रदेशातील उत्तरकाशीत एक टेम्पो ट्रॅव्हलर खोल दरीत कोसळल्याने झालेल्या भीषण अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला. तर २ जण गंभीर जखमी झाले आहेत. गंगोत्री महामार्गावर भटवाडीपासून सुमारे सात किमी गंगोत्रीच्या दिशेने जाताना आज (सोमवारी) हा अपघात झाला.

एका बाजूला डोंगराची कडा तर दुसऱ्या बाजूला खाली गंगा आणि भागिरथी नदीच्या पात्रामुळे मृतदेह बाहेर काढण्यास अडथळे आले. अपघातग्रस्त बसमध्ये गंगेच्या खोऱ्यातील भंकोली गावचे नागरिक प्रवास करीत होते. हे लोक देवस्थान गंगोत्री धाम येथून स्नान करुन परतत होते.

या अपघातात मिनाक्षी नामक १३ वर्षीय तर राधा नामक १४ वर्षीय दोन मुली गंभीर जखमी झाल्या आहेत. या दोघींनाही जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले आहे. घटनास्थळी  पोलीस आणि एसडीआरएफचे पथक दाखल झाले आहे. बचाव कार्य सुरु करण्यात आले आहे.