उत्तम माणूस कसा घडवायचा हे तुकोबारायांनी शिकवले – देवेंद्र फडणवीस

91

पुणे, दि. ८ (पीसीबी) – ज्ञानोबारायांनी विश्व कल्याणाचा मंत्र दिला तर अध्यात्म आणि भौतिक जीवनाची सांगड घालून उत्तम माणूस कसा घडवायचा?, हे संत तुकोबारायांनी शिकविले, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ‘संतदर्शन चरित्र-ग्रंथा’चे प्रकाशन पुण्यात करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

आपली संतपरंपरा फार मोठी आहे. महाराष्ट्राच्या समाजमनात त्याचे प्रतिबिंब दिसून येते. महाराष्ट्रधर्म आणि मराठी विचार, मराठी संस्कृती समृद्ध होण्याचे मूळ हे या संतपरंपरेत आहे, असेही ते म्हणाले.

संत साहित्यातील तत्व, विचार, सत्य हे वास्तविकतेच्या आधारावर आणि आजच्या पिढीच्या परिस्थितीसापेक्ष मांडणे, ही काळाची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले.