उच्च न्यायालयाचा पत्नीला खर्चासाठी महिना ७० हजार रुपये देण्याचा आदेश

34

मुंबई, दि. ११ (पीसीबी) – मुंबईत उच्च न्यायालयाने एनआरआय पतीला पत्नीला खर्चासाठी महिना ७० हजार रूपये देण्याचा आदेश दिला आहे. पत्नी फक्त २० हजार रूपयांत आपला आणि दोन मुलांचा खर्च भागवू शकेल अशी अपेक्षा करणे चुकीचे असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. पती दुबईत वास्तव्यास असून महिना तीन लाख रूपये पगार आहे. न्यायालयाने पतीला महिन्याला ७० हजार रूपये आदेश दिला आहे. पत्नी आपल्या दोन मुलांसोबत कांदिवलीत वास्तव्यास आहे.