उच्च तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत कोरोनाग्रस्त

9

मुंबई,दि. २९ (पीसीबी) : राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्वीट करत याबाबतची माहिती दिली. माझ्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी ठणठणीत असून पुढील आठवड्यात जनतेच्या सेवेत रुजू होणार, अशी माहिती उदय सामंत यांनी ट्वीटद्वारे दिले.

गेले दहा दिवसमी मी स्वत: विलगीकरणात आहे. त्यामुळे मी स्वतः कोविड टेस्ट करून घेतली. याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी गेले दहा दिवसात कोणाच्याही संपर्कात नसल्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता अगदी कमी आहे. तरीही माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी, असे आवाहन उदय सामंत यांनी केले आहे. तसेच मी ठणठणीत असून पुढच्या आठवड्यात जनतेच्या सेवेत रुजू होणार, असेही उदय सामंत म्हणाले.

सध्या उदय सामंत यांची प्रकृती ठणठणीत असून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे ते त्यांचं कामकाज सुरु ठेवणार आहेत, अशीही माहिती मिळत आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण झाली होती. त्याशिवाय राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण झाली होती. यापुर्वी अशोक चव्हाण, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड आदी १० मंत्र्यांनी कोरोनाची बाधा झाली होती.

WhatsAppShare