उघड्या दरवाजा वाटे प्रवेश करून एक लाखांचे दागिने चोरीला

32

काळेवाडी, दि. १२ (पीसीबी) – उघड्या दरवाजावाटे घरात प्रवेश करून अज्ञात चोरट्याने एक लाख आठ हजारांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना 5 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा ते साडेसहा वाजताच्या कालावधीत तापकीरनगर, काळेवाडी येथे घडली.

नितीन रामचंद्र कदम (वय 49, रा. साई मल्हार कॉलनी, तापकीर नगर, काळेवाडी) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या घराचा दरवाजा उघडा असताना अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला. घरातून एक लाख आठ हजार रुपये किमतीचे तीन तोळे 6.390 ग्रॅमचे सोन्याचे दागिने चोरट्याने चोरी करून नेले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare