उघड्या दरवाजावाटे 11 हजार रुपयांची चोरी

0
88

घराच्या उघड्या दरवाज्यावाटे प्रवेश करत घरातून रोख रक्कम, ड्रायव्हिंग लायसन्स, एटीएम कार्ड असा 11 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना सोमवारी (दि. 10) मध्यरात्री पावणे एक वाजताच्या सुमारास श्रीकृष्ण कॉलनी, थेरगाव येथे घडली.

प्रांजल सुनील झुंजारराव (वय 24, रा. श्रीकृष्ण कॉलनी, थेरगाव) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांच्या घराचा दरवाजा पुढे केला होता. आरोपीने उघड्या दरवाजा वाटे घरात प्रवेश करून घरातून रोख रक्कम, ड्रायव्हिंग लायसन्स आणि दोन एटीएम कार्ड असा एकूण 11 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.