उघड्या दरवाजावाटे पाऊण लाखांची चोरी

104

भोसरी,दि.13(पीसीबी) : रात्रीच्या वेळी उघड्या दरवाजावाटे प्रवेश करून अज्ञात चोरट्यांनी घरातून 72 हजारांचे मोबईल, दागिने आणि इतर साहित्य चोरून नेले. ही घटना सोमवारी (दि. 12) साली लांडगे वस्ती, भोसरी येथे उघडकीस आली.

धीरज देविदास धारपवार (वय 30, रा.लांडगे वस्ती, भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी लांडगे वस्ती येथे तानाजी लांडगे यांच्या बिल्डींगमध्ये राहतात. रविवारी (दि. 11) रात्री साडेअकरा वाजता फिर्यादी त्यांच्या घराचा दरवाजा उघडा ठेऊन झोपी गेले. रात्रीच्या वेळी अज्ञात चोरटे उघड्या दरवाजावाटे घरात आले. त्यांनी घरातून मोबईल फोन, सोन्या-चांदीचे दागिने, कागदपत्रे, मोबईल फोन ठेवलेली पर्स असा एकूण 72 हजारांचा ऐवज चोरून नेला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare