उघड्या दरवाजातून प्रवेश करून चार मोबाईल पळवले

36

वल्लभनगर, दि. १२ (पीसीबी) – खोलीचा दरवाजा उघडा ठेऊन चौघेजण झोपी गेले. रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी उघड्या दरवाजावाटे रूममध्ये प्रवेश करून चौघांचे चार मोबाईल फोन चोरून नेले. ही घटना सोमवारी (दि. 11) सकाळी आठ वाजता वल्लभनगर पिंपरी येथे उघडकीस आली.

वेस्ली वर्गीस (वय 19, रा. वल्लभ नगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे मित्र रूमच्या दरवाजाची आतून कडी न लावता रूममध्ये झोपले. त्यावेळी चोरट्यांनी फिर्यादीचा पाच हजार रुपये किमतीचा मोबाईल, अब्दुल्लाह उमर शेख बिस्मिल्लाह (वय 19) यांचा सात हजार रुपये किमतीचा मोबाईल, अभिजेय बी. (वय 20) यांचा नऊ हजार रुपये किमतीचा मोबाईल, शालिम स्वरूपकुमार शिंदे यांचा 40 हजार रुपये किमतीचा मोबाईल, असे एकूण 61 हजार रुपये किमतीचे चार मोबाईल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. चोरीचा हा प्रकार रविवारी (दि. 10) रात्री साडेअकरा ते सोमवारी (दि. 11) सकाळी आठच्या दरम्यान घडला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare