‘ईव्हीएम हटाव, देश बचाव’; राष्ट्रवादीच्या खासदारांची दिल्लीत निदर्शने  

85

नवी दिल्ली, दि. २९ (पीसीबी) – आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीतून  ईव्हीएम हटवण्यात यावे, या मागणीवरून आज (बुधवार) राष्ट्रवादीच्या खासदारांनी दिल्लीच्या जंतर-मंतरवर निदर्शने केली. यावेळी राष्ट्रवादीच्या खासदारांनी ‘ईव्हीएम हटाव, देश बचाव’ अशी घोषणाबाजी केली. या आंदोलनात खासदार सुप्रिया सुळे, धनंजय महाडिक, वंदना चव्हाण, फौजिया खान आदी उपस्थित होते.