इलेक्ट्रिक दुकानातून दीड लाखांची वायर चोरीला

67

भोसरी, दि. २७ (पीसीबी) – एमआयडीसी भोसरी परिसरातील एका इलेक्ट्रिक दुकानातून अज्ञात चोरट्यांनी एक लाख 55 हजारांची वायर चोरून नेली. ही घटना मंगळवारी (दि. 26) सकाळी उघडकीस आली.

ज्ञानदेव दिलीप पाटील (वय 34, रा. मोशी) यांनी याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे भोसरी एमआयडीसी परिसरात श्री इलेक्ट्रिकल्स नावाचे दुकान आहे. हे दुकान सोमवारी (दि. 25) रात्री नऊ ते मंगळवारी (दि. 26) सकाळी नऊ या कालावधीत बंद होते. त्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी दुकानाचा दरवाजा तोडून दुकानात प्रवेश केला. दुकानातील इनॅमेल्ड कॉपर वाइंडिंग वायरचे 10 बंडल असा एकूण एक लाख 55 हजार रुपये किमतीचा माल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare