इम्रान खान यांचाही केजरीवाल झाला ? कुमार विश्वास यांची टिप्पणी

179

नवी दिल्ली, दि. १ (पीसीबी) – पाकिस्तानचे नियोजित पंतप्रधान इम्रान खान यांनी आपण साध्याच घरात राहू व सगळी सरकारी भव्य निवासस्थाने जनतेला अर्पण करू असे म्हटले आहे. यावर आपचे माजी नेते कुमार विश्वास यांनी माने ये बी शुरू? इतकेच म्हणत यांचाही केजरीवाल झाला? असा अर्थ निघेल असे  ट्विट केले. त्यानंतर सोशल मीडियावर केजरीवाल यांचा पाकिस्तानी अवतार अशा नेटिझन्सनी इम्रान खान यांच्यावर टीका करायला सुरूवात केली आहे.  

पंतप्रधानांच्या भव्य महालात मी राहणार नाही, तर लहानशा घरात राहीन आणि पंतप्रधानांचा भव्य महाल शिक्षणसंस्थांसाठी वापरू, अशी घोषणा पाकिस्तानचे भावी पंतप्रधान इम्रान खान यांनी केली होती. मात्र, जिवाला धोका असल्यामुळे त्यांना पंतप्रधानांच्या त्या महालातच रहावे लागणार असल्याचे पोलिसांनी व सुरक्षा यंत्रणांनी म्हटले आहे.

सुरक्षा यंत्रणांनी इम्रान खान यांच्या घराची पाहणी  करून सुरक्षेच्या दृष्टीने इम्रान व पक्षातील अन्य नेत्यांशी चर्चा केली. सुरक्षेच्या दृष्टीने इम्रान यांना इस्लामाबाद येथील पंतप्रधान निवासाच्या भव्य महालातच रहावे लागेल, असे त्यांनी म्हटले आहे. यावर  सोशल मीडियातून टीका होऊ लागली आहे.