इम्रानला पोलिसांच्या ताब्यातून पळवून नेण्याचा कट आखणारे सर्व गुंड शार्प शूटर

1826

औरंगाबाद, दि. २८ (पीसीबी) –  कुख्यात गँगस्टर इम्रान मेहदी याला औरंगाबादच्या तुरुंगातून जिल्हा न्यायालयात नेण्यापूर्वीच पोलिसांच्या ताब्यातून पळवून नेण्याचा कट रचणाऱ्या मध्य प्रदेशातील ७ तर स्थानिक ४ गुंडांना पोलिसांनी सोमवारी शिताफीने अटक केली. मध्य प्रदेशातील गुंडांच्या टोळीतील सर्वच जण शार्प शूटर शरफू टोळीतील असल्याचे पोलिसांनी सांगितले. नफीस खान मकसूद खान (४०), नकीब खान रियाज मोहंमद (५५), फरीद खान मन्सूर खान (३५), शब्बीर खान समद खान (३२), फैजुल्ला गनी खान (३७), शाकीर खान कुर्बान खान (४०) अशी या आरोपींची नावे आहेत. तर त्यांना मदत करणारे शहरातील शेख यासेर शेख कादर (२३, रा. कौसर पार्क, नारेगाव), सय्यद फैसल सय्यद एजाज (१८, रा. किलेअर्क), मोहंमद नासेर मोहंमद फारूख (२४, रा. चंपा चौक) व मोहंमद शोएब मोहंमद सादेक (२८, रा. जाहेदनगर) यांनाही अटक करण्यात आली.