इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू

77

हिंजवडी, दि. २९ (पीसीबी) – फॅब्रिकेशनचे काम करत असताना एक कामगार इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून खाली पडला. यामध्ये गंभीर जखमी होऊन कामगाराचा मृत्यू झाला. कामगाराला सुरक्षा साधने न पुरवल्या बाबत ठेकेदाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नासीर उस्मान शेख असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. सोहेल आजीमुद्दीन शेख (वय 33, रा. कुंदनवाडा, भवानी पेठ, पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक उद्धव खाडे तपास करीत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुनावळे येथे 41 ईस्टेरा या इमारतीचे बांधकाम सुरु आहे. इमारतीमधील फॅब्रिकेशनचे काम सोहेल शेख याने घेतले आहे. मयत कामगार नासीर शेख हा आरोपी सोहेल याच्याकडे काम करत होता. नासीर शेख हा 7 जून रोजी सायंकाळी पावणे सहा वाजता इमारतीमध्ये पाचव्या मजल्यावर काम करत असताना त्याचा तोल जाऊन तो पाचव्या मजल्यावरून खाली पडला. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. सोहेल शेख याने कामगाराला सुरक्षेची साधने पुरवली नाहीत. त्यांना धोकादायक काम करायला लावून निष्काळजीपणा केला असल्याने गुन्हा दाखल करण्यात आला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare