इगतपुरीत एकाच कुटूंबातील तीघांची धारदार शस्त्राने वार करुन हत्या

66

इगतपुरी, दि. १ (पीसीबी) – शेजारी राहणाऱ्या चुलत भावाने  चुलती, भावजय आणि  पुतण्याची धारदार शस्त्राने वार करुन निघृर्ण हत्या केल्याची खळबळजनक घडना उघडकीस आली आहे. ही धक्कादायक घटना इगतपुरी तालुक्यातील खेड भैरव परिसरात शनिवारी उघडकीस आली.

या हल्ल्यात हिराबाई चिमटे (वय ६०), मंगल चिमटे (वय ३०), रोहित चिमटे असे हत्या झालेल्या एकाच कुटूंबातील तीघांची नावे आहेत. तर यश हा चिमुकला धोडक्यात बचावला आहे. याप्रकरणी पोलिसांनी सचिन चिमटे (वय २१) या तरुणाला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माळवाडी येथे गणेश चिमटे आपल्या कुटुंबासोबत राहतात. काही कामानिमित्त गणेश कावनईला गेला होता. घरात त्याची आई, पत्नी आणि मुले होती. यावेळी शेजारीच राहणारा त्याचा चुलत भाऊ सचिन चिमटे याने अचानक घरात शिरुन चुलती हिराबाई चिमटे, भावजय मंगल यांच्यावर धारधार शस्त्राने हल्ला केला. या दोघींनाही प्रतिकार करता आला नाही. यामुळे त्या जागीच ठार झाल्या.  झटापटीत रोहीत चिमटे याच्या मानेवर शस्त्राचा घाव बसला तर  यश या बालकावर देखील वार झाले. पण यश घराबाहेर पळाल्याने तो बचावला. रोहित आणि यश हे  दोघे जखमी झाल्याने त्यांना तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रोहितचा रुग्णालयात नेत असतानाच मृत्यू झाला तर जखमी यशवर उपचार सुरु आहेत. पोलिसांनी घटना स्थळी धाव घेऊन सचिन चिमटेला ताब्यात घेतले आहे. या हत्याकांडामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. इगतपुरी पोलिस तपास करत आहेत.